रमजान ईद उत्साहात चा सण साजरा करावा.- पो नि चाटे, कस्तुरे , चाऊस.
परळी- एम एन सी न्यूज नेटवर्क -तालुक्यातील पोलीस प्रशासनाकडून इफ्तार पार्टीतून दिला सामाजिक भाईचाऱ्यांचा संदेश तसेच अफवांवर विश्वास न ठेवता ईदचा सण साजरा करावा पोलिसांनी आयोजित केलेल्या दि १८ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीत केले.यावेळी परळी शहर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे , ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे, आणि संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी याप्रसंगी सांगितले.
ईद हा बंधुभाव वृद्धिंगत करणारा सण असून कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता येणारा रमजान ईद चा सण उत्साहात साजरा करावा.
पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि १८ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि संभाजी नगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर,रुपेश शिंदे व इतर कर्मचारी यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या . यावेळी तोहीद शेख, गुड्डू ,काकर ,फिरोज खान उर्फ जनाब, बाबा शेख,
फुले-शाहू- आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे सह आदींची उपस्थित होते.