
लाखो भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, आणि लाखो भाविकांनी घेतले दर्शन
परळी/प्रतिनिधी- महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे लाखो भाविकांची मांदियाळी दिसून आली.ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्र महोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. हर हर महादेव, वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष रागांमध्ये निनादत होता. आज श्रींच्या दर्शनासाठी सुमारे चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज होता. सकाळी आठच्या सुमारासच लाखो भाविक मंदिर परिसरात दिसून येत होते, तर पश्चिम घाटावरील मोठ्या पायऱ्यावर मंदिरापासून शेवटच्या पायरी पर्यंत महिला आणि पुरुषांची मोठी गर्दी होती.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर या वर्षी मोठ्या उत्साहात होत असलेला महाशिवरात्री महोत्सवाच्या पावन पर्वावर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी मोठ्या संख्येने राज्यासह शेजारील आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यातील भाविकांसोबतच पश्चिम बंगालमधील,बिहार येथील भाविकांच्या बसेस सुद्धा रस्त्यावर दिसून येत होत्या.
◾शिस्तबद्ध रांग व्यवस्थेमुळे लाखों भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ घेता आला. सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन सज्जा आणि तत्पर असल्याचे दिसून येत आहे. रांगांमध्ये पिण्याचे फायदे जागोजागी दिसून आली
◾मुंडे बंधू -भगिनी चे देवदर्शन-
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मुंडे बंधू- भगिनीनी प्रभुवैद्यनाथाचे दर्शन घेतले पंकजा मुंडे यांनी सकाळी आठच्या सुमारास प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. धनंजय मुंडे यांनी सपत्नीक दर्शन घेतले.
◾विविध पक्ष संघटना चें फराळ वाटप
महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरात दाखल होणारे भाविकांना विविध सामाजिक संस्था सेवा संस्था संघटना पदाधिकारी यांनी मंदिर परिसरात जागोजागी फराळ, केळी, साबुदाणा उसळ, फराळी चिवडा, स्वच्छ पिण्याचें पाणी आदी सुविधा सेवाभावणेतून उपलब्ध करून दिल्या होत्या.
◾यात्रेनिमित्त शहरात विविध खेळाचे प्रकार लहान मोठे राहट पाळणे, मेरी गो राऊंड टोरा टोरा, बच्चे कंपनीसाठी ड्रॅगन, ज्वेलरी, क्रोकरी, मुलांसाठी खेळण्याचे साहित्य विक्रेते, खाण्याचे पदार्थ विकणारे विविध व्यावसायिक हॉटेल्स ही शहरात यात्रेकरूंसाठी सजली आहेत.
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील जागृत देवस्थान श्री सोमेश्वर भगवंताचा पालखी सोहळा प्रभु वैद्यनाथ दर्शनासाठी जिरेवाडी ते परळी असा दरवर्षीप्रमाणे महाशिवराञी निमित्ताने परळीत दाखल झाला होता.
◾ महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील शिव मंदिरे गजबजली
तालुक्यातील धर्मापुरी टोकवाडी जिरेवाडी आणि परिसरात असलेल्या इतर शिव मंदिरात भाविक भक्तांचा उत्साह दिसून आला,तर श्री सोमेश्वर संस्थान व जिरेवाडी गावकरी मंडळीं कडून अनेक वर्षांपासुनची परंपरा असलेल्या या सोमेश्वराचा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. जिरेवाडी येथुन पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. टाळकरी मंडळी, लहान मुलामुलींचे टिपरी पथक, लेझीम पथक, कलशधारी महिला व परीसरातील भाविक या सोहळ्यात सहभागी होते.

