जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड

गेल्या अनेक वर्षांपासून पंकजाताईंचे संस्थेवर निर्विवाद वर्चस्व!

परळी वैजनाथ- एमएनसी न्यूज नेटवर्क – जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. या गटात उमेदवारी अर्ज दाखल केलेले सदाशिव आप्पा मुंडे यांचे नातेवाईक बालाजी गिते यांनी माघार घेतली आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब व पंकजाताई मुंडे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळाच्या ३४ जागांसाठी सध्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांनी हितचिंतक सभासद गटातून उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात संस्थेचे सदाशिव आप्पा मुंडे यांचे भाचे बालाजी रामचंद्र गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बालाजी गिते यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने पंकजाताई मुंडे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. यापूर्वी आश्रयदाता सभासद गटाची जागा बिनविरोध निवडून आल्याने आता ३२ जागेसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान बिनविरोध निवडून आल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे संस्थेच्या संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.