परळी परिसरात लम्पि स्कीन आजार

परळी- एम एन सी न्यूज नेटवर्क- शहर आणि परिसरात रस्त्यावर लम्पि स्किन आजाराने बाधित आणि जखमा चिघळलेल्या अवस्थेतील जनावरे मोठ्या प्रमाणात दिसून येत असून याची संख्या प्रचंड वाढली आहे. अंगातून स्त्रावणारे रक्त अंगावर माशा अशी जनावर रस्त्याने शेजारून जाताना मोठी घृणा निर्माण होत आहे. मात्र या बाबीकडे नगरपरिषद प्रशासना सह पशुवैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात शंभर टक्के लसीकरण केल्याचा गव गवा केला जात आहे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती भयावह दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालतांना मोकाट जनावरांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

……………………………………………………………………………………………….
लसीकरण करण्यात येणार

शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना न.प. कर्मचाऱ्यांच्या वतीने पकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन त्याचे लसीकरण करण्यात येणार आहे.

त्रिंबक कांबळे
मुख्याधिकारी न प परळी वैजनाथ
………………………………..

परळी तालुक्यात लम्पि स्कीन या आजाराची सप्टेंबर ऑक्टोबर 2022 च्या दरम्यान लागण झाली होती. दरम्यान लसीकरण झालेल्या पशुधनाची संख्या 38000 हजार होती. यातील 57 जनावरे दगावल्याचे तर सद्यस्थितीत 35 पशुधन बाधित आहे.