यंदाचे वर्ष बळीराजासाठी सर्वसाधारण -भेंडवळ भविष्यवाणी

बुलढाणा : एम एन सी न्यूज नेटवर्क गेल्या कित्येक वर्षाची भेंडवळ भविष्य ची परंपरा असलेल्या बुलाढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी पंरपरेसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. घटमांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी ही परंपरा जोपासली जाते. त्यानुसार चालू वर्षातील आर्थिक, राजकीय, कृषी, सांस्कृतीक घडामोडीचा अंदाज वर्तवण्यात येतो. गेल्या 370 वर्षांपासून ही पंरपरा सूरू आहे. यंदा अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी भेंडवळचं भाकीत वर्तवण्यात आलं.

रविवारी सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली . भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदाचे वर्ष बळीराजासाठी सर्वसाधारण असे असणार आहे. भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात कमी पाऊस असेल, जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असेल असं सागण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना यंदाही अतिवृष्टीचा फटका बसेल असं भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आलं आहे. भविष्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तवताना राजा स्थिर असेल असं भेंडवळ भविष्य वाणीत सांगितले असून. घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात आरोग्याच्या समश्या ची शक्यता वर्तवताना रोगराईची परिस्थिती असेल असं भविष्य म्हटलं आहे.