मुंबई-एम एन सी न्यूज नेटवर्क– भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात (आरबीआय) कडून एचडीएफसी बँकेच्या उपव्यवस्थापकपदी करण्यात आलेल्या कैझाद भरुचा यांच्या तसेच भावेश झवेरी यांच्या कार्यकारी संचालकपदावरील नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे.
कैझाद भरुचा हे करियर बँकर असून त्यांच्याकडे ३५ वर्षांचा अनुभव आहे. ते बँकेशी १९९५ पासून संलग्न आहेत. सध्या ते कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असून त्यांच्यावर होलसेल बँकिंग सह कॉर्पोरेट बँकिंग, पीएसयूज, कॅपिटल आणि कमॉडिटीज मार्केट्स, वित्तीय संस्था, कस्टडी, म्युच्युअल फंड्स, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर अॅण्ड फायनान्शियल स्पॉन्सर्स कव्हरेज सह बँक कव्हरेजचा समावेश आहे.
तसेच भावेश झवेरी हे एचडीएफसी बँकेच्या ऑपरेशन्स, कॅश मॅनेजमेंट आणि एटीएम प्रॉडक्टचे ग्रुप हेड आहेत. सध्या त्यांच्यावर देशभरातील बिझनेस आणि ऑपरेशन्सच्या जबाबदारीसह बँकेची विविध उत्पादने कॉर्पोरेट, एमएसएमई आणि रिटेल क्षेत्रातील मालमत्ता, देणी आणि व्यवहारांसह पेमेंट आणि कॅश मॅनेजमेंट, ट्रेड फायनान्स आणि ट्रेझरी व एटीएम उत्पादने पोहोचवण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे.