किसान सभा, पायी मोर्चावर ठाम
अहमदनगर-अकोले- अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च केल्यानंतर; बाकी प्रलंबित शेतीप्रश्नांसाठी किसान सभेने, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर राज्यभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पायी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता व सदर मोर्चाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रत्यक्ष मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील याचा अंदाज वर्तवला जात असताना राज्य सरकारने समोपचाराने घेत किसान सभेच्या शिष्टमंडळाला आज सह्याद्री अतिथीगृहवर चर्चेसाठी आमंत्रित केले.
चर्चेत किसान सभेकडून, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, कॉम्रेड उमेश देशमुख, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड संजय ठाकूर, कॉम्रेड किसन गुजर, कॉम्रेड अमोल वाघमारे आणि कॉम्रेड अजय बुरांडे यांनी सहभाग नोंदवला तर राज्यशासनातर्फे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल सचिव, दुग्ध विकास सचिव व ईतर संबंधित खात्याचे अधिकारी हजर होते.
चर्चेसाठीची बैठक २.५ ते ३ तास चालल्याची माहिती मिळत आहे व बैठकीत सकारात्मक चर्चा जरी झाली असली तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय न निघाल्याने, शेतकऱ्यांचा पायी मोर्चा २६ एप्रिल रोजी अकोले येथून नियोजित वेळेला निघेल व लोणी येथील महसूल मंत्र्याच्या कार्यालयावर २८ एप्रिलला पोहोचेल, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चाचे रूपांतर बेमुदत महामुक्काम आंदोलनात हजारो हजारो शेतकरी सहभागी होऊन आंदोलन करणार