महात्मा बसवण्णाचे विचार आत्मसात करणे काळाची गरज-पो.नि उमाशंकर कस्तुरे

महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सामाजिक समता प्रस्थापित केली- ओमप्रकाश बुरांडे

परळी /एम एन सी न्यूज नेटवर्क- महात्मा बसवेश्वरानी रूढी, परंपरा,कर्मकांड झुगारून समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले. साडे तीनशे पेक्षा जास्त जातींना एकत्रित करून समतावादी लिंगायत धर्माची स्थापना केली असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे यांनी केले.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे दि २५ एप्रिल २०२३ रोजी आयोजित महात्मा बसवण्णा यांची ९१८ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षिय समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक परळी शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. उमाशंकर कस्तुरे हे होते तर प्रमुख उपस्थितीत संपादक आत्मलिंग शेटे, प्रा. प्रवीण फुटके, आश्विन मोगरकर, ॲड. मनोज संकाये हे होते.
यावेळी बोलताना कस्तुरे यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, बसवेश्वरांनी स्त्री मुक्ती, जातीनिर्मुलन,शिक्षण प्रसार असे कार्य केले. सद्य परिस्थितीत त्यांचें विचार व कार्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

बुरांडे पुढे म्हणाले, की, जगातील पहिली संसद अनुभव मंडप बसवेश्वरांनी स्थापन केली. त्यामध्ये वेगवेगळ्या जातींचे सातशे प्रतिनिधी होते त्यापैकी १८० स्त्रिया होत्या. या संसदेचे प्रमुख पद त्यांनी स्त्रीयांना दिले होते .असेही ते म्हणाले
या कार्यक्रमास मोहन वाव्हळे, स्वानंद पाटील, श्रीराम लांडगे,दिपक गित्ते, लक्ष्मण वैराळ, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नितीन ढाकणे यांनी मानले.