परळीत आ. मुंडे यांच्या हस्ते आद्य शंकराचार्य चौक व प्रदक्षिणा मार्ग फलकाचे आनावरण

परळी वैद्यनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क- आज आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने वैद्यनाथ परिसरातील हरीहर तीर्थ पुढील चौकास आद्य शंकराचार्यांचे नामकरण तसेच प्रदिक्षणा मार्गास देखील आद्य शंकराचार्य यांचे नाव देण्यात आले.नवीन फलकाचे अनावरण आ. धनंजयजी मुंडे  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

परळी वैद्यनाथ नगरी आद्य शंकराचार्यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेली नगरी.द्वादश पंचम् ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी आद्य शंकराचार्य आपल्या नगरीत आल्याची नोंद वैद्यनाथ देवल कमेटी जवळ असून शृंगेरीपीठाने वैद्यनाथ देवस्थान यांना तसे पत्र पण पाठविलेले आहे.

यावेळी वैद्यनाथ देवल कमेटीचे सचिव राजेश देशमुख,विश्वस्थ प्रा.बाबासर देशमुख,नागनाथकाका देशमुख,डॉ. गुरुप्रसाद देशपांडे,पुजारी,तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,राजेंद्र सोनी,जयराज देशमुख,रमेश चौंडे,सचिन जोशी,रामभाऊ गोस्वामी,श्रीरामपंत जोशी,जितेंद्र नव्हाडे,मनोज रामदासी,प्रल्हाद बिडकर,राजीव तिळकरी प्रदीप अग्निहोत्री,श्रीपाद पाठक,महेश विर्धे,संजय गिराम,दिनेश लोंढे,ऋषीकेश नागापूरे,सुरेश राजूरकर,प्रमोद औटी,प्रशांत नाईक,बालाजी शहाणे,महेश देशपांडे,दयानिधी खिस्ते,मिलिंद देशपांडे,दीपक जोशी,दत्ता गोस्वामी,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.