◾पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते.
मोहाली- पंजाब- पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे मंगळवारी निधन झाले.ते 95 वर्षाचे होते. शुक्रवारी सकाळी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही महिन्यात त्यांची प्रकृती बिघडली होती जून 2022 मध्येही छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . प्रकृती पुन्हा खालावल्याने सप्टेंबर 2022 रोजी त्यांना पीजीआय चंदीगडमध्ये दाखल करण्यात आले.
प्रकाशसिंग बादल यांनी 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबमधील अकाली दलाची दयनीय अवस्था पाहून प्रकाशसिंग बादल निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.