बाजार समिती निवडणूक निकालावर पंकजाताई मुंडे यांची प्रतिक्रिया
परळी वैजनाथ-एमएनसी न्यूज नेटवर्क-जिल्हयात बीड वगळता सर्व ठिकाणी बाजार समिती निवडणुकीत प्रत्येकाने आपापली सत्ता राखली आहे, यात आमची मतं मात्र कायम आहेत, उलट मतांचं प्रमाण वाढलेलं आहे हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी सकारात्मक बाब आहे.त्यामुळे बाजार समित्यांचे निकाल अनपेक्षित, धक्कादायक वगैरे लागलेले नाहीत अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निकालाचा एकूण कल बघता बीड वगळता ज्या बाजार समितीत ज्यांची सत्ता होती, त्यांनी ती राखून ठेवण्यात यश मिळवल्याचे दिसून येते. आमच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वाभिमानानं आणि स्वतःची निवडणूक समजून लढली. ज्याचा परिणाम निकालावरही दिसला. निवडणुकीत सोसायटी, ग्रामपंचायत मध्ये आमच्या मतांचा टक्का मात्र वाढलायं .
राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतचं करायचं असतं. जे विजयी झालेत त्यांचं अभिनंदन आणि जे पराभूत झालेत त्यांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा देते. कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आणि दाखवलेला स्वाभिमानी लढावू बाणा असं सकारात्मक दृष्टीने या निकालाकडे पाहिलं पाहिजे असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.