“नागरी सहकारी बँकातील प्रशिक्षण” पुस्तकाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर- एम एन सी न्यूज नेटवर्क- दि. 29 एप्रिल रोजी “नागरी सहकारी बँकातील प्रशिक्षण” या पुस्तकाचे प्रकाशन माननीय श्री अतुलजी सावे,(सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, (संचालिका दत्ताजी भाले रक्तपेढी) या होत्या.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कृष्णा इन्स्टिट्यूट चे अभिजीत धर्माधिकारी यांची होती.
हे पुस्तक सहकार सुगंध प्रकाशन पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे .